Homeताज्या बातम्या

तीन वर्षांनंतर वन पर्यटन केंद्र सुरू; आत मात्र दुरावस्था लाखोंची सौर यंत्रणा निष्क्रिय; चोरी, देखभालीच्या अभावामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह

शेवगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले वन पर्यटन केंद्र अखेर जनतेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पत्रकारांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सोमवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र केंद्राचे कुलूप उघडताच आत समोर आलेले वास्तव धक्कादायक असून, वन विभागाच्या निष्काळजी कारभाराचे विदारक चित्र उघड झाले आहे.परिसरातील अनेक झाडे जळालेल्या अवस्थेत आढळून आली. उद्यानातील दिव्यांची चोरी झाल्याचेही निदर्शनास आले. पिण्याच्या पाण्यासाठी असलेली विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून, विहिरीवर बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील साडेसात हॉर्सपॉवर क्षमतेच्या पंपाचा स्टार्टर चोरीला गेला आहे. याशिवाय पंपाच्या विद्युत वायर देखील चोरट्यांनी लंपास केल्याने संपूर्ण सौर यंत्रणा निष्क्रिय झाली आहे.पर्यटन केंद्रावर रात्रीच्या वेळी देखभालीचे काम करणारे वनमजूर चंद्रभान चितळे यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून विहिरीत पाणी उपलब्ध नाही. स्टार्टर चोरीला गेल्यानंतर अद्याप नवीन स्टार्टर बसविण्यात आलेला नसून, मोटारीचा वीजपुरवठाही सुरू करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या केंद्रावर सौरऊर्जा यंत्रणा बसविणारे ठेकेदार राम केदार यांनी सांगितले की, शासनाच्या माध्यमातून सुमारे साडेतीन ते पावणेचार लाख रुपये खर्च करून येथे सौर विद्युत प्रणाली उभारण्यात आली होती. मात्र योग्य देखभालीचा अभाव, सुरक्षेतील त्रुटी आणि सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ही संपूर्ण यंत्रणा आज निष्प्रभ ठरली आहे. परिसरातील साहित्याची चोरीही वारंवार होत असल्याचे त्यांनी सांगितले.वन पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले, तरी तेथील मूलभूत सुविधांची झालेली दुरवस्था, पाणीटंचाई, चोरीच्या घटना आणि सुरक्षा व्यवस्थेचा अभाव पाहता वन विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे, प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अन्यथा केवळ कुलूप उघडल्याने पर्यटनाला चालना मिळणार नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.वन पर्यटन केंद्रातील कोरडी पडलेली विहीर, चोरीमुळे निष्क्रिय झालेली सौरऊर्जा यंत्रणा.

काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
तीस वर्षांनंतर भेटले श्री संत निळोबाराय विद्यालयाचे सवंगडी  
oplus_0

COMMENTS