Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये एलसीबीची धडक कारवाईतेलंगणातील तस्कर अटकेत, 1 किलो 40 ग्रॅम गांजा जप्त, महिला आरोपी फरार

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आणखी एक मोठे यश मिळवले आहे. देगलूर नाका परिसरा

पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
प्रदीर्घ अनुभवी विश्वंभर पलेवाड यांनी स्वीकारला भोकर पोलिस निरीक्षक पदभार; गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईचे संकेत


नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आणखी एक मोठे यश मिळवले आहे. देगलूर नाका परिसरात छापा टाकून पोलिसांनी तेलंगणा राज्यातील एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून, त्याच्याकडून 1 किलो 40 ग्रॅम गांजा व अन्य साहित्य असा एकूण 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नांदेडमधील एका महिलेचे नाव समोर आले असून ती सध्या फरार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला. तेथे संशयास्पद हालचाल करणार्‍या एका व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत 1 किलो 40 ग्रॅम सुकलेला गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपले नाव मोहम्मद आमेर मोहम्मद इस्माईल (वय 23, रा. बोधन, जि. निजामाबाद, तेलंगणा) असे सांगितले. प्राथमिक चौकशीत त्याने हा गांजा नांदेडमधील पूजा जोंधळे हिच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. संबंधित महिला आरोपी फरार असून तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 52 हजार रुपयांचा गांजा आणि 200 रुपयांची बॅग असा एकूण 52 हजार 200 रुपयांचा ऐवज आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी इतवारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्ह्यात अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे, दारू, गुटखा, जुगार व अवैध वाळू वाहतुकीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS