Homeताज्या बातम्या

त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

बीड : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीड पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिल्लोड, जि. छत्रपत

गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा
कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात
Minor Girl Assault Case : ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कारमधून नेऊन डोंगराळ भागात अत्याचार


बीड : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीड पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील त्र्यंबक नगर भवन परिसरातून एका अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 437/2024 अन्वये कलम 363 भादंवि प्रमाणे अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पुढे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीडकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी हाती घेतला. तपासादरम्यान त्यांनी फिर्यादी, साक्षीदार यांची चौकशी करून पीडित मुलगी व संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास पथके पाठवली. बीड जिल्ह्यासह पुणे आणि अहिल्यानगर परिसरातही शोध घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पीडित मुलगी व आरोपी हे सिल्लोड येथील त्र्यंबक नगर भवन परिसरात असल्याची माहिती मिळवली. माहितीची खात्री करून एएचटीयू बीड पथक दि. 24 जून 2026 रोजी सिल्लोड येथे रवाना झाले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने एएचटीयू पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली. रात्रीच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले तसेच अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींसह पीडित मुलीला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सर्वांना माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक उषा चौरे, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई भाऊसाहेब कारले तसेच एएचटीयू बीड पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. एएचटीयू पथकाच्या या कामगिरीमुळे अल्पवयीन मुलीच्या शोधाला यश आले असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS