Homeअहमदनगर

स्वच्छता,आरोग्य आणि शिक्षणासाठी रोटरी कटिबद्ध : बोराशेवगाव बसस्थानकातील पाणपोईचे नूतनीकरण; २५ डस्टबिनचे लोकार्पण

शेवगाव : समाजाच्या गरजा ओळखून लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविणे हे रोटरीचे ध्येय असून, रोटरी ही केवळ सेवा संस्था नसून समाज परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर ईश्वर बोरा यांनी केले. रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या वतीने शेवगाव बसस्थानकातील पाण पोईचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण तसेच शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी २५ डस्टबिनच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे व ईश्वर बोरा यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना बोरा यांनी समाजातील मूलभूत गरजा लक्षात घेऊन सेवा उपक्रमांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या चारही क्षेत्रांत रोटरी सातत्याने कार्यरत असून, आगामी काळातही नागरिकांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेवगाव बसस्थानकातील पाणपोईच्या नूतनीकरणाचा संपूर्ण खर्च लोहोटी ज्वेलर्सचे संचालक प्रवीण लाहोटी यांनी स्वखर्चातून केला. आधुनिक जलशुद्धीकरण सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेल्या या पाणपोईमुळे दररोज हजारो प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. उन्हाळ्यासह वर्षभर प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार असून बसस्थानकातील महत्त्वाची गरज या माध्यमातून पूर्ण झाली आहे.याचबरोबर शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी २५ डस्टबिन ठेवण्यात येणार असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होऊन स्वच्छतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.  रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष युसुफखान पठाण यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच स्वच्छ शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा क्लबचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव विजयकुमार मुधोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास डॉ. संजय लड्डा, डॉ. भगनाथ काटे, आगार प्रमुख अमोल कोतकर, प्रवीण लाहोटी, नगरसेवक आशुतोष डहाळे, वजीर पठाण, खंडू बुलबुले, सुनील काकडे तसेच रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  
पारनेरमध्ये पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू  

COMMENTS