Homeताज्या बातम्या

खेळाचे मैदानच सशक्त पिढी घडवेल; ‘संजीवनी नेक्सस स्पोर्टस् फेस्ट-२०२६’ उत्साहात संपन्न

कोपरगाव: सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला नैराश्य, ताण-तणाव आणि विविध मानसिक-शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत म

नेकनुर येथील एसबीआय एटीएम चार महिन्यांपासून बंद; नागरिकांचा बँक प्रशासनाविरोधात संताप
पेपरफुटी ‘सरकार’मुळे तरुणांचे भविष्य धोक्यात; माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरातांचा घणाघात
राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूच्या खांद्यावर भारताच्या वेटलिफ्टिंगची धुरा; ग्लासगो २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा

कोपरगाव: सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला नैराश्य, ताण-तणाव आणि विविध मानसिक-शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत मैत्री, संघभावना, नेतृत्व, शिस्त तसेच यश-अपयश स्वीकारण्याची ताकद शिकवणारे खेळाचे मैदान हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुमित कोल्हे यांच्या पुढाकारातून संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ‘संजीवनी नेक्सस स्पोर्ट्स फेस्ट-२०२६’ या महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ संजीवनी अकॅडमी (वैजापूर) च्या संचालिका निकिता कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे डायरेक्टर (नॉन-अकॅडमिक) डी. एन. सांगळे, एस.जी.ओ. आसिफ सय्यद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी निकिता कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना खेळभावना, शिस्त आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती जपत स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

यंदाच्या महोत्सवात पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित एरो अपेक्स, अॅक्वा एवेंजर्स, इग्निस इन्फर्नो आणि टेरा टायटन्स या चार संघांची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, दोरीखेच, रिले स्पर्धा, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, धावणे, पोहणे, रायफल शूटिंग आणि टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोप सोहळ्यात विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व पदके देऊन गौरविण्यात आले.

COMMENTS