Homeताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यालय हे जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पंचायत आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्वाचे केंद्र म

घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 
पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण



नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यालय हे जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पंचायत आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू असतानाही जिल्हा परिषद परिसरात सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, साचलेले घाणीचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधी यामुळे या कार्यालयाची प्रतिमा मलिन झाली आहे. याचा फटका येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी तसेच कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना बसत आहे. इमारतीच्या पायर्‍यांचे स्लॅब व ग्रील खराब असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह परिसरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग, झुडपे आणि साचलेले सांडपाणी दिसून येते. विशेषतः महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, औषध भांडार, यांत्रिकी विभाग, सर्व शिक्षा अभियान आणि एनआरएलएमसारख्या महत्त्वाच्या कार्यालयांच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कर्मचार्‍यांना दैनंदिन कामकाज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, महिला कर्मचार्‍यांनाही गैरसोयीचा अनुभव येत असल्याची चर्चा आहे. या मुख्यालयात जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून दररोज शेकडो नागरिक आणि हजारो कर्मचारी ये-जा करतात. अनेक महत्त्वाच्या शासकीय योजनांशी संबंधित कामे याच ठिकाणी पार पडत असल्याने परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तुंबलेल्या गटारी, पडून असलेले भंगार साहित्य, वाढलेली झाडाझुडपे आणि अस्वच्छ परिसर यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्थानिकांच्या मते, रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून, काही ठिकाणी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढल्याचीही चर्चा आहे. परिसरात सुरक्षा रक्षक असले तरी देखभाल आणि स्वच्छतेकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यालगतही गटारांचे पाणी साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी जिल्हा परिषदेच्या वैभवाचे प्रतीक मानला जाणारा हा परिसर आज दुर्लक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, नालेसफाई, भंगार हटविणे, प्रकाश व्यवस्था सुधारणे आणि नियमित देखभाल करण्याची मागणी कर्मचारी व नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS