नांदेड: भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तरच्या वतीने हदगाव-हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांची (बीएलए-२) महत्त्वपूर्ण बैठक शनि
नांदेड: भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तरच्या वतीने हदगाव-हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांची (बीएलए-२) महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता हदगाव येथील मधुबन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस प्रदेश महामंत्री सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, जिल्हा प्रभारी किरण पाटील तसेच जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बैठकीस हदगाव विधानसभा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, मंडळ सरचिटणीस, मतदार यादी प्रमुख (बीएलए-१), बूथस्तरीय कार्यकर्ते (बीएलए-२) तसेच ‘मन की बात’ मंडळ प्रमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः बूथस्तरीय कार्यकर्त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, मतदार संपर्क, बूथ व्यवस्थापन आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपा हदगाव-हिमायतनगर विधानसभा पदाधिकार्यांनी दिली आहे.

COMMENTS