Homeताज्या बातम्या

नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला

नांदेड: जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी मंगळवारी (दि. २४ जून) अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा पोलीस दलातील वरि

अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
शिर्डीत ‘अन्नभेसळ’कडून हजारो किलो माल नष्ट; मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ

नांदेड: जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी मंगळवारी (दि. २४ जून) अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या पोलीस अधीक्षकांच्या स्वागतासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यापूर्वी नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अबीनाश कुमार यांची पुणे शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर राज्य शासनाने निलभ रोहन यांची नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली. निलभ रोहन यांनी यापूर्वी विविध ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकाभिमुख पोलीस प्रशासन राबविणे यासाठी त्यांची विशेष प्रशंसा झाली होती. त्यांच्या शिस्तबद्ध व परिणामकारक कार्यपद्धतीमुळे त्यांनी पोलीस खात्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

नांदेड हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि संवेदनशील जिल्हा मानला जातो. वाढती गुन्हेगारी, सायबर गुन्हे, वाहतूक समस्या तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस अधीक्षकांसमोर असणार आहे. त्यामुळे निलभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणे याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास पोलीस विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. निलभ रोहन यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या कार्यकाळाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS