बीड: मीरा हॉस्पिटल ते तहसील कार्यालय (क्रांतीनगर) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला ८९ लाख ९९ हजार ४३१ रुपयांचा निधी मंजूर होऊन वर्क ऑर्डर निघून

बीड: मीरा हॉस्पिटल ते तहसील कार्यालय (क्रांतीनगर) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला ८९ लाख ९९ हजार ४३१ रुपयांचा निधी मंजूर होऊन वर्क ऑर्डर निघूनही अडीच महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत बीडमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी वर्क ऑर्डर झाल्यानंतरही काम रखडल्याने नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. या मुख्य मार्गावरून दररोज रुग्ण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र, रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेमुळे नागरिकांना दररोज विविध अडचणींचा आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे.
संबंधित प्रशासन व कामाची अंमलबजावणी करणार्या यंत्रणेने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत काम सुरू न झाल्यास बीड नगरपरिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रा. सनी वाघमारे यांनी प्रशासनावर तोफ डागत, “रस्ता मंजूर आहे, निधी मंजूर आहे; आता नागरिकांना फक्त काम प्रत्यक्ष सुरू झालेले पाहायचे आहे,” अशी आक्रमक भूमिका मांडली. तसेच “सिताई कंट्रक्शन, जनतेला देऊ नका टेन्शन; कामाला द्या गती आणि विकासाला द्या दिशा,” असे खोचक आवाहन करत कंत्राटदाराला खडे बोल सुनावले.

COMMENTS