Homeताज्या बातम्या

ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप

वडवणी: तिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा लाईफ कॉम्प्युटर, बीडचे संचालक अमित शेंडगे यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्य

अखेर 378 दिवसांनी संपले शेतकरी आंदोलन, शेतकरी घरी परतणार | LOKNews24
महिला अत्याचारातील वाढ चिंताजनक
उष्णतेमुळे त्वचा रोगाचे आजार वाढले

वडवणी: तिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा लाईफ कॉम्प्युटर, बीडचे संचालक अमित शेंडगे यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप केले आहे.

ज्या शाळेतून शिक्षणाची सुरुवात झाली, ज्या शिक्षकांनी घडविले आणि आयुष्याला दिशा दिली, त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.

यावेळी बोलताना अमित शेंडगे म्हणाले की, “मी आज जे काही आहे, त्याची पायाभरणी याच शाळेत झाली आहे. त्यामुळे शाळेप्रती असलेल्या प्रेमातून आणि कृतज्ञतेतून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.” माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ शाळेशी नाते जपत, तेथील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा एक आदर्श संदेश या उपक्रमातून समाजाला देण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांकडून मोठे कौतुक केले जात आहे.

COMMENTS