Homeताज्या बातम्या

बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी

मुंबई: योजना पूर्ण आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ महावितरणच्या थकबाकीमुळे नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने बीड शहराला तब्बल २० दिवसांआड पाणीपुरव

नाट्यशास्त्र प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; बीडमधील केशरबाई क्षीरसागर महाविद्यालयाचा उपक्रम
विजेच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणच्या गलथान कारभारावर ग्रामस्थ संतप्त
मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट

मुंबई: योजना पूर्ण आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ महावितरणच्या थकबाकीमुळे नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने बीड शहराला तब्बल २० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीपुरवठा जर २ दिवसांवर आणायचा असेल तर बीड नगरपालिकेला मिळालेला १५ व्या वित्त आयोगाचा ४८ कोटींचा निधी महावितरणकडे वळवावा, जेणेकरून वीज जोडणी मिळून पाणीप्रश्न सुटेल, अशी आग्रही मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडली आह

बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीची माजलगाव बॅकवॉटर योजना सुरू आहे. मात्र, शहराची झपाट्याने वाढणारी ३ लाख लोकसंख्या पाहता ही योजना अपुरी पडत आहे. त्यामुळे २०१७ मध्ये २४ टीएमएलटी क्षमतेची नवीन ‘अमृत अटल योजना’ मंजूर झाली होती, जिचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. ही योजना सध्या पूर्णत्वास आली आहे, मात्र महावितरण कंपनीची जुनी थकबाकी असल्याने या नवीन योजनेला वीज कनेक्शन मिळण्यात अडचण येत आहे.

या गंभीर विषयावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात वारंवार आवाज उठवला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी आपण अजितदादा यांची भेट घेतली होती आणि त्यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. आता पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून बीडकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. शासनाने नगरपालिकेच्या १५ व्या वित्त आयोगाचे ४८ कोटी रुपये महावितरणला वर्ग केल्यास थकबाकी नील होईल आणि नवीन वीज जोडणीचा मार्ग मोकळा होईल. यामुळे शहराला दोन दिवसांआड पाणी देणे शक्य होणार आहे. आ. क्षीरसागर यांच्या या महत्त्वपूर्ण प्रस्तावानंतर आता शासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्व बीडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS