Homeताज्या बातम्या

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप

मुंबई: ठाकरे गटातून नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी थेट पत्रकारांना धमकी देत शिवीगाळ केल्या

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग! पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; बंडखोरांसह नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
के. एस. पी. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
Sanjay Dina Patil - VIDEO: 'आईच्या गां%$ गेलं, गां%# बोट घालतात..', शिंदे  गटात गेलेल्या संजय पाटलांची घाणेरडी भाषा, कॅमेऱ्यात सगळं कैद - shinde shiv  sena mp sanjay dina ...

मुंबई: ठाकरे गटातून नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी थेट पत्रकारांना धमकी देत शिवीगाळ केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी राज्यभरात उमटले. या प्रकरणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलगिरी व्यक्त करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलीस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, याच प्रकरणावर थेट जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली.

संतापाच्या भरात पाटील कॅमेऱ्यासमोर म्हणाले, “अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगीच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” या अर्वाच्य भाषेतील धमकीमुळे पत्रकार वर्गासह संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे.

गंभीर दखल; दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश

पत्रकारांबाबत झालेल्या या आक्षेपार्ह वर्तनाची शासनाने गंभीर दखल घेतली असून, लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी संयम आणि सन्मानाने वागणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात बोलताना नेत्यांनी सांगितले की, पत्रकारांशी अशी भाषा किंवा वर्तन अजिबात योग्य नाही. या घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून संबंधित खासदारांना तात्काळ दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विधानसभेत विरोधकांनी सरकारला विचारला जाब

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी हा विषय थेट सभागृहात उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी संयमित आणि जबाबदारीची भाषा वापरणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाना पटोले यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकावले जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा घटनांमुळे लोकशाही मूल्यांना मोठा धक्का बसतो. सरकारने या प्रकरणात तातडीने आपली भूमिका स्पष्ट करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या पत्रकारांच्या सुरक्षेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS