Homeताज्या बातम्या

जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन

बीड: जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने जिल्हा न्यायालय बीड येथे योग दिन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्या

समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख पदांची नियुक्ती; प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री दुचाकीस्वाराला लुटणार्‍या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद

बीड: जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने जिल्हा न्यायालय बीड येथे योग दिन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. दि. २१ जून २०२६ रोजी जिल्हा न्यायालयातील हॉल जी-५ येथे बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, कर्मचारी व विधिज्ञांसाठी हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

प्रमुख न्यायाधीशांची उपस्थिती आणि मार्गदर्शन

या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. दिनेश पी. सुराणा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सयद, जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. आर. शिंदे तसेच इतर न्यायिक अधिकारी आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. पिसोरे व त्यांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. योग दिन कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून माजी प्रबंधक श्रीमती संगीता देशपांडे व श्रीमती पोरवाल यांनी उपस्थित सर्वांना विविध योगासने करून घेतली, तसेच नियमित योगाभ्यासामुळे होणारे आरोग्यदायी फायदे सविस्तर समजावून सांगितले.

योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित नको

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. आर. शिंदे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. योग हा केवळ २१ जूनच्या एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनाचा नियमित भाग बनवावा, असे सांगत सर्वांनी दररोज किमान एक तास योगाभ्यास करून आपले आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा. श्री. मुलानी साहेब यांनी केले. जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी व विधिज्ञांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. एस. टी. शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS