बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)मोठी कारवाई केली आहे. केज शहरातील उमरी रोड परिसरातील वि

बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)मोठी कारवाई केली आहे. केज शहरातील उमरी रोड परिसरातील विशाल डेअरीच्या मिठाई उत्पादन केंद्रावर (एफडीए)च्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. या कारवाईत अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत तयार करण्यात येणार्या खाद्यपदार्थांचा तब्बल 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते व भेसळ करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी केलेल्या तपासणीत उत्पादन केंद्रामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात हलवा, कलाकंद व इतर मिठाईजन्य पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 17 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित उत्पादन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. (एफडीए) च्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळ करणार्यांना चांगलाच धक्का बसला असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अशा कारवायांमुळे अन्न सुरक्षेबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

COMMENTS