Homeताज्या बातम्या

पंचायत समिती कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार मिळेना पालकमंत्री विखेंना निवेदन देत मांडल्या व्यथा

राहाता :  पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचा मागील सहा महिन्यांचा पगार थकित आहे. पगार तात्का

भोंदू बाबाच्या कथित “चेल्या”वर अत्याचाराचा आरोप प्रकरण दडपल्याची चर्चा; भोंदू बाबा गणेश शिंदे अटकेत
लूटमार करणारा आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात
राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन


राहाता :  पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचा मागील सहा महिन्यांचा पगार थकित आहे. पगार तात्काळ करावा या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना गट संसाधन कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे.
डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीतील सहा महिन्याचा पगार शासनाकडून करण्यात आलेला नाही, या विभागातील कर्मचारी हे पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन तसेच जलजीवन मिशन या मोठ्या स्वरूपाची कामे पाहतात परंतु पगार होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यापदी अनावस्था येत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना ही बाब कर्मचारी यांनी सविस्तर सांगितली असून कार्यवाहीचे आश्वासन कर्मचारी यांना देण्यात आले आहे.
निवेदन देण्यासाठी यावेळी राज्य गट संसाधन समीतिचे अध्यक्ष यशोदास खरात, राहाता अध्यक्ष भारत बनसोडे, सागर कुऱ्हे, लहानु बेल्हेकर, संदीप हिरंगे, सागर आहेर, अरुण थोरात, निलेश ब्राह्मणे, योगेश पारखे, सचिन बोरुडे, अशोक कडलक तसेच किरण बारहाते आदी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS