Homeताज्या बातम्या

कब्रस्तानच्या जागेतील रस्ता व नालीचे काम तात्काळ थांबवावेसामाजिक कार्यकर्ते आसीम जरगर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

मौजे धारूर येथील सर्वे क्रमांक 622 व 623 मधील नुरबाग परिसरातील कब्रस्तानच्या जागेत सुरू असलेले रस्ता व नाली बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित अधिका

अल्पवयीन मुलास मारहाण  
बीडमध्ये कादरी फाउंडेशन आक्रमकनाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा हजारोंचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक


मौजे धारूर येथील सर्वे क्रमांक 622 व 623 मधील नुरबाग परिसरातील कब्रस्तानच्या जागेत सुरू असलेले रस्ता व नाली बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आसीम जरगर यांनी नगर परिषद धारूरच्या मुख्याधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आसीम जरगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धारूर शहराच्या विकासाच्या नावाखाली नगर परिषद धारूरमार्फत कंत्राटदाराच्या माध्यमातून सर्वे क्रमांक 622 व 623/अ या जागेत रस्ता व नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र संबंधित जागेत मुस्लिम समाजाचे कब्रस्तान तसेच दरगाह असून ती मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचे स्थान आहे. अशा धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय सर्वे क्रमांक 622, 623/अ व 623/आ या जमिनींसंदर्भात दिवाणी दावा क्रमांक 124/2019 हा मा. दिवाणी न्यायालय, माजलगाव येथे न्यायप्रविष्ट असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सत्यप्रत नगर परिषद धारूरकडे यापूर्वीच सादर करण्यात आली असून संबंधित जमीन वादग्रस्त असल्याची माहिती प्रशासनाला असतानाही तेथे विकासकामे सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, सर्वे क्रमांक 622 ही जमीन इनामी स्वरूपाची असून तिची नोंद वक्फ गॅझेटमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जागेवरील कोणतेही बांधकाम कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याशिवाय करण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. जर संबंधित काम तात्काळ थांबविण्यात आले नाही, तर धारूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील आसीम जरगर यांनी दिला आहे. या परिस्थितीत उद्भवणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची जबाबदारी प्रशासन व शासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कब्रस्तानच्या जागेतील सुरू असलेले रस्ता व नालीचे काम तात्काळ बंद करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

COMMENTS