Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका

मुंबई ः आमदार आपात्रतेच्या सुनावणीचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारी रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे, यासंदर्भात विधानसभे

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली
पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका
मुंबईतील डान्सबारला पोलिसांचे संरक्षण

मुंबई ः आमदार आपात्रतेच्या सुनावणीचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारी रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे, यासंदर्भात विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा नेमका रोख कोणावर होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
10 जानेवारीला मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, पुढच्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे, अशी आमची माहिती आहे. ते आता नवरदेव कोण आहेत, हे 10 तारखेच्या निकालानंतर कळेल. त्यामुळे बच्चू कडूंना अंदाज आला असेल की आता मंडपही बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय. त्यामुळे काही खरे नाही. मुख्यमंत्री शिंदे पदावरून पायउतार झाल्यानंतर ती संधी अजित पवारांना मिळणार का? असे विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून अनेकजण तयार आहेत. पण मला वाटते की नवीन नवरदेव तयार आहेत.
आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून चर्चा केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडीवर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. आमचा पक्ष आहे, पक्षाचे भले कुठे होईल, त्यानुसार विचार केला जाईल, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला. यावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडू यांच्यासाठी विचार करू असे म्हणत असतानाच महायुती सरकारवर टीका केली आहे. 10 जानेवारीच्या सुनावणीत 16 आमदार अपात्रच होतील, असा दावा विरोधकांनी केला असून मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा एकदा जोर आला आहे. तसंच, मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे बच्चू कडूही म्हणाले आहेत. याबाबत विजय वडेट्टीवारांना विचारले असता ते म्हणाले, बच्चू कडू काय म्हणतात ते पुढच्या काळात ठरेल. ते चांगेल मंत्री होते. परंतु तिकडे (शिंदे गटात) गेले. त्यामुळे तेही (मंत्रीपद)गेले अन् हेही गेले. त्यांची महाविकास आघाडीत येण्याची तयारी असेल आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करू आणि हायकमांडच्याही कानावर टाकू. बच्चू कडूंची तयारी असेल तर चर्चा करायला तयार आहेत. त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे ते त्यांना कळले असेल असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS