Homeताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला बळ; बीडमध्ये बाजीराव दादा चव्हाण यांच्या वतीने महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचे स्वागतशिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍यात महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याचा आढावा; पक्षविस्तारासाठी सक्रिय होण्याचे आवाहन

बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश

शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड
अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फेरोज खान यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट


बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍या अंतर्गत बीड विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या दौर्‍यानिमित्त राज्यसभा खासदार तथा पक्ष प्रवक्त्या डॉ. ज्योतीताई वाघमारे, राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी., उपनेत्या श्रीमती कला शिंदे, श्रीमती विजया पोटे, श्रीमती संगीता ठोंबरे तसेच महिला विकास आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांचे बीड नगरी (चंपावती नगरी) येथे आगमन झाले. यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक तथा लोकसभा संपर्कप्रमुख आरोग्यसेवक बाजीराव दादा चव्हाण यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला. बैठकीदरम्यान महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला सक्षमीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख निलेश पवार, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मातकर यांच्यासह महिला पदाधिकारी, युवासैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍याच्या माध्यमातून महिला आघाडीचे संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

COMMENTS