Homeताज्या बातम्या

चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त; वाळू माफिया बाळू खेडकरविरुद्ध गुन्हा

बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या हायवावर चकलांबा पोलिसांनी कारवाई करत वाहन जप्त केले असून, या प्रकरणी वा

जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
गेवराई मतदारसंघात सामाजिक उपक्रमांनीमाजीमंत्री बदामराव पंडितांचा वाढदिवस साजरा
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक


बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या हायवावर चकलांबा पोलिसांनी कारवाई करत वाहन जप्त केले असून, या प्रकरणी वाळू माफिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या बाळू उर्फ रत्नेश्वर शहादेव खेडकर याच्याविरुद्ध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुका आणि चकलांबा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. बाळू खेडकर याच्याकडून हायवा वाहनाद्वारे चोरटी वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चकलांबा पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळूने भरलेला हायवा ताब्यात घेण्यात आला. स्थानिक नागरिकांकडून यापूर्वीही बाळू खेडकरविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 190/2026 आणि 191/2026 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतरही काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असून, पोलिसांनी त्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू खेडकर सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या पथकाने केली. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

COMMENTS