Homeताज्या बातम्या

नियमभंग महागात; नगरपालिका व वाहतूक पोलिसांचा अतिक्रमणावर दणका

बीड नगरपालिका मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या

नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला? : हाडा  


बीड नगरपालिका मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या  मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये नाल्यांवर व सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला हातगाड्या लावून अतिक्रमण करणार्यांवर नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण 10 अतिक्रमणे काढली. यापूर्वी संबंधित हातगाडीधारकांना नाल्यांवर व वाहतुकीस अडथळा ठरणार्या ठिकाणी व्यवसाय करू नये, अशा  सूचना देवून पुष्पगुच्छ देवून आता तोंडी सांगतो यानंतर कारवाई करु असे समजविण्यात आले होते मात्र हातगाड्यावाल्यांकडून सूचना करूनही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वसुदेव मिसाळ व राख, पोलीस हवालदार सखाराम घोलप, आदिनाथ मुंडे, काकडे, कुडके, महिला पोलीस अंमलदार उषा गाडे, पवार, तिडके, पोलिस अंमलदार मोरे,  कानडे, दहातोंडे, घाडगे, जिल्हा वाहतुक शाखेचे चालक संतोष हारके व कदम यांनी सहभाग नोंदवून कर्तव्य बजावले. तसेच नगरपालिका कर्मचारी अतिक्रमण पथकप्रमुख मुन्ना गायकवाड, भागवत जाधव, शरद खुपसे, विकी दागड, लखन तुसांबड, अविनाश दुलगज, महेश खुपसे, किरण भिसे, राम रोकडे, पवन लाहोट आदींनी सहभाग नोंदविला . या मोहिमेदरम्यान नाल्यांवर उभारण्यात आलेल्या हातगाड्या हटविण्यात आल्या तसेच संबंधितांना भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण न करण्याचा इशाराही देण्यात आला. नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा बाधित होण्याची शक्यता असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगरपालिका प्रशासनाने व जिल्हा वाहतूक शाखेने शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले. या संयुक्त कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास आणि स्वच्छता व्यवस्थेला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
सूचना दुर्लक्षित कराल तर कारवाई अटळ-वैभव पाटील
व्यापारी बांधवांना या अगोदर फुल देवून समजावले होते की अतिक्रमण करुन नागरिकांना वेठीस धरु नका परंतू व्यापारी व हातगाडी चालक यांच्याकडून नियमांचे सतत उल्लंघन होत आहे यामुळे व्यापारी बांधवांनी नागरिकांना, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा कारवाई अटळ राहील असे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी म्हटले आहे.

COMMENTS