लिंबागणेश : हिंदवी स्वराज्याच्या जननी तथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण

लिंबागणेश : हिंदवी स्वराज्याच्या जननी तथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, दि. १७ जून रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रनिष्ठा आणि न्यायप्रियतेचे मूल्य आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. १७ जून हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील भावनिक आणि प्रेरणादायी दिवस मानला जातो. जिजाऊंची पुण्यतिथी हा केवळ स्मरणाचा दिवस नसून संस्कार, राष्ट्रभक्ती, महिला सक्षमीकरण आणि स्वराज्याच्या मूल्यांचे पुनर्स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून समाजात नैतिकता, कर्तृत्वनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रुजविण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्रजी निर्मळ, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, नानासाहेब वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, दिलीप ढास, गणेश थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी आदी उपस्थित होते.

COMMENTS