Homeताज्या बातम्या

बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची सुरुवात; कायदेशीर मदत आणि शासकीय योजना आता एकाच छताखाली

बीड : समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांना अधिक बळकटी देण्यासाठी बीडमध्ये एक महत्त्वाचे

बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची स्थापना; मोफत आरोग्य तपासणी शिबिरासही मोठा प्रतिसाद
लिंबागणेश मंडळात महसूल प्रशासनाची पाहणीअंजनवतीतील नुकसानग्रस्तांना तहसीलदार शेळके यांचा तातडीचा दिलासा
इमामपूर रोडवरील डोंगर भागात अनधिकृत उत्खननावर महसूलची धडक कारवाई; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दोन हायवा केले जप्त

बीड : समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांना अधिक बळकटी देण्यासाठी बीडमध्ये एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तहसील कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय परिसरात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांच्या हस्ते या केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, अण्णा वंजारे, विधीदूत अशोक तांगडे आणि तत्त्वशील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता, वारसाहक्क, कौटुंबिक वाद, निवृत्तीवेतन आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या समस्यांवर मोफत कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी हे केंद्र प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास डॉ. सय्यद यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी ज्येष्ठांना ऑनलाइन सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, या केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांची विविध शासकीय कार्यालयांत होणारी पायपीट थांबणार असून त्यांना आवश्यक अर्ज प्रक्रिया, तक्रार निवारण आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये डॉ. स्वप्ना घोळवे आणि डॉ. भिसे यांनी ज्येष्ठांची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.

COMMENTS