Homeताज्या बातम्या

पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुण गौरव’ पुरस्कार जाहीर; सुपा आणि पारनेर परिसरात आनंदाचे वातावरण

सुपा : सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि जनजागृती क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल रांजणगाव रोड (ता. पारनेर) येथील ज्य

शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा
अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप
‘पैशाच्या व्यवहारासाठी अक्कल लागते’; तोतया पत्रकार झोंटिंगकडून पोलिसांच्या नावाने पैशांची मागणी अहिल्यानगर पोलिसांची बदनाम; पोलिसांनी दाखल करावा गुन्हा

सुपा : सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि जनजागृती क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल रांजणगाव रोड (ता. पारनेर) येथील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार इकडे यांची ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार-२०२६’साठी निवड करण्यात आली आहे. ‘बी द चेंज फाउंडेशन’तर्फे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांवर सातत्याने निर्भीड लेखन करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन इकडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. त्यांच्या लेखनामुळे आणि कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा निर्माण होत असल्याची भावनाही संस्थेने व्यक्त केली आहे.

रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात राजकुमार इकडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, विशेष भेटवस्तू आणि पारंपरिक फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक तुपे यांनी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे या निवडीची माहिती दिली आहे. पत्रकार राजकुमार इकडे यांच्या या यशाबद्दल आणि निवडीबद्दल पत्रकारिता, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS