Homeताज्या बातम्या

बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा

अ‍ॅड. गोविंद शिराळे पाटील यांची आग्रही मागणी बीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका (बार्शी रोड) दरम्यान सुरू असलेल्या सिम

बीड जिल्ह्यातील बँक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांची नेमणूक करा; अनिल बोर्डे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
रहेमत पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी निवड
बीड बस स्थानकावरील महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांची रंगेहात धडक कारवाई, दोन महिला अटकेत

अ‍ॅड. गोविंद शिराळे पाटील यांची आग्रही मागणी

बीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका (बार्शी रोड) दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामाची तातडीने दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजप नगरसेवक तथा युवा नेते अ‍ॅड. गोविंद नवनाथराव शिराळे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी लातूर येथील राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण भ. सुमंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात अ‍ॅड. शिराळे यांनी नमूद केले आहे की, या प्रमुख मार्गावरील पुनर्बांधणीचे काम संथ गतीने सुरू असून त्याच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्याच्या सबग्रेडसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत अ‍ॅड. शिराळे यांनी ड्रेनेजची पातळी चुकीची व असमान असल्याचे सांगितले. त्यामुळे MoRTH (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) आणि IRC मानकांनुसार रस्त्याची गुणवत्ता तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात, तसेच जबाबदार ठेकेदार व अभियंत्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत लातूर येथील फौजदारी वकील विजयजी माने उपस्थित होते.

COMMENTS