Homeताज्या बातम्या

“शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते” – भाई सथ्था रात्र शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; डॉ. पारस कोठारी यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर : शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था रात्र माध्यमिक

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड पशुपालकांसाठी ‘मृगजळच’
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचेच मानधन बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
अहिल्यानगरमध्ये २७ मे पासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांचा अंदाज

अहिल्यानगर : शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था रात्र माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. पारस कोठारी हे होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कोठारी म्हणाले, ‘‘शिक्षणासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. शिक्षण घेण्याची इच्छा, जिद्द आणि आयुष्यात पुढे जाण्याची तयारी असेल, तर कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकते. या विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मैत्रीपूर्ण नातेसंबंधातून शिक्षण दिले जाते. या रात्रशाळेत एकाच वर्गात पती-पत्नी, सासू-सून, आई-मुलगी तसेच वडील-मुलगा यांनी एकत्र शिक्षण घेऊन यश मिळविल्याची अनेक आदर्श उदाहरणे आहेत.’’

विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या ‘शिक्षणदूत’ उपक्रमांतर्गत शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे. या उपक्रमाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, नोकरी करणारे युवक-युवती तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी रात्रशाळेतील विविध वर्गांमध्ये प्रवेश घेतला आहे.

या कार्यक्रमाला प्राचार्य सुनील सुसरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य सुनील सुसरे यांनी विद्यालयातील शैक्षणिक सुविधा, अध्यापन पद्धती आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भुते यांनी केले, तर गजेंद्र गाडगीळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, अनंत फडणीस आणि डॉ. रमेश झरकर आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS