Homeताज्या बातम्या

“वृद्धत्व हा गुन्हा नाही; अत्याचाराचा बळी ठरत असलेले ज्येष्ठ नागरिक चिंतेचा विषय” – डॉ. हंसराज वैद्य

नांदेड : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांवरील वाढत्या अत्याचारांबाबत समाजात व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. वृद्धत्व

नांदेडकरांवर ‘स्मार्ट मीटर’चा दबाव? अखंड वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरलेल्या महावितरणची नवी मोहीम
विष्णुपुरीत उद्यापासून ७ दिवसीय भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवास प्रारंभ; शिवभक्तांसाठी भक्ती आणि अध्यात्माची पर्वणी
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार दखलपात्र गुन्हा; कायद्यानुसार संपत्तीही मागता  येते, ॲड प्रमोद ढोकले यांचे प्रतिपादन

नांदेड : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांवरील वाढत्या अत्याचारांबाबत समाजात व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. वृद्धत्व हा गुन्हा नसून आज अनेक ज्येष्ठ नागरिक विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक अत्याचारांचे बळी ठरत आहेत, अशी खंत फेस्कॉम (FESCOAM), उत्तर मराठवाडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्र संघाने २०११ पासून १५ जून हा दिवस ‘जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन’ म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. वैद्य यांनी सांगितले की, वृद्धत्व म्हणजे समाजाचा अनुभवसंपन्न ठेवा आणि देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार जगातील सहापैकी एक वृद्ध व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अत्याचाराला बळी पडत आहे, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि लज्जास्पद आहे.

ज्येष्ठ नागरिकांवर शारीरिक, वाचिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आर्थिक आणि नैतिक अशा सात प्रकारांनी अत्याचार होत आहेत. औषधोपचारासाठी पैसे न देणे, शाब्दिक अपमान करणे, वृद्धांना ओझे समजणे आणि त्यांना एकाकीपणाकडे ढकलणे अशा घटना समाजात वाढत आहेत. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शासन स्तरावर होत असलेला वयभेद हा सर्वात मोठा अन्याय आहे. नुकतीच १० जून रोजी नांदेड येथे हजारो ज्येष्ठ नागरिकांनी मूक फेरी काढून ६० वर्षे वयापासून मासिक ५ हजार रुपये सन्मानधन लागू करणे आणि स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी केली होती. “ज्या हातांनी देश घडविला, त्या हातांना भिक्षा नव्हे तर सन्मान हवा,” असे सांगत ज्येष्ठ नागरिकांना न्याय, सुरक्षा आणि हक्क मिळवून देण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे आवाहन डॉ. हंसराज वैद्य यांनी केले.

COMMENTS