Homeताज्या बातम्या

संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे; दिवसा १० तास विजेसाठी शिंदे सेनेचा सरकारला घरचा आहेर

देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा किमान १० तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा य

गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवण; चौंडीत अनोखा सोहळा, ७०० लेक-जावई आणि हजारो नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
सहकारी बँकांसाठी नियमित व दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम काळाची गरज; सिमला येथील परिषदेत प्रा. भानुदास बेरड यांचे प्रतिपादन
श्रीगोंद्यात भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी लाचेची मागणी; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा किमान १० तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनेनेच थेट शासन आणि महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने या आंदोलनाची तालुकाभर जोरदार चर्चा रंगली आहे.

संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देवळाली प्रवरा मंडळातील टाकळीमिया, खुडसरगाव, लाख, जातप, देवळाली प्रवरा यांसह ३२ गावांमध्ये वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी दिवसा केवळ दोन तासच वीज मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे पिकांना पाणी देणे आणि शेतीची कामे करणे अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयातील पंखे बंद करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कार्यकारी अभियंता आर. एच. रजपूत आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश वडते आणि कनिष्ठ अभियंता एस. बी. विटनोर यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, राहुरी विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एम. बोरसे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे, राजेंद्र लोंढे, प्रकाश देठे, सचिन करपे यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS