बीड : समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील एकता नगर येथील त्यांच्या निवासस्थानी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आ

बीड : समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील एकता नगर येथील त्यांच्या निवासस्थानी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेल्या कुरेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गेल्या अनेक वर्षांपासून गरजू व वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार्या जावेद भैय्या कुरेशी यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत यंदाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याच्या भावनेतून मोठ्या संख्येने युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी युवा नेते इम्रान खान यांनी स्वतः रक्तदान करून जावेद भैय्या कुरेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजासाठी कार्य करणार्या व्यक्तींचा वाढदिवस केवळ औपचारिक शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता अशा सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करणे ही काळाची गरज आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने नियमित रक्तदानाची सवय लावावी. या शिबिरात असंख्य युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले. कार्यक्रमादरम्यान रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात आले असून, त्याचा लाभ गरजू रुग्णांना होणार आहे. जावेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम बीड शहरात चर्चेचा विषय ठरला असून, अशा समाजोपयोगी उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

COMMENTS