Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण

ठाणे प्रतिनिधी - ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी योग्य माणसाला संधी द्या ;-शुभांगी पाटील
मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका | LOKNews24
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस 70 लाखांचा नफा

ठाणे प्रतिनिधी – ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्या कासरवडवली परिसरात ही घटना घडली. ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रोषणी यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहेत. तसेच, ‘सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे.. वरुण म्हणजे?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका महिलेला मारहाण महिलांकडून मारहाण होत असल्याचे दिसत आहे. ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती, ठाकरे गटाची महिला पदाधिकारी असून रोषणी शिंदे असे तिचे नाव आहे. तसेच, ज्या महिलांनी रोषणीला मारहाण केली त्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी असल्याचा आरोप केला जात आहे.

COMMENTS