Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमनाथवाडीकरांचा पाणीटंचाई इंगोले परीवाराच्या माणुसकी मुळे सुटला- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील बालाघाटा वरील संत बेलेश्वर महाराजांच्या पावनभुमीत मौजे.सोमनाथवाडी अंदाजे 600 लोकसंख्या असणारं गाव 4 थी पर्यंत गाव

चांदोली राष्ट्रीय उद्यानात झाडांची राजरोसपणे कत्तल
SATARA : अजित पवार आणि शरद पवारांवर खासदार उदयनराजेंनी केली आगपाखड (Video)
केज च्या बस स्थानकावर 85 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू ! l LokNews24

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील बालाघाटा वरील संत बेलेश्वर महाराजांच्या पावनभुमीत मौजे.सोमनाथवाडी अंदाजे 600 लोकसंख्या असणारं गाव 4 थी पर्यंत गावात जिल्हा परिषद शाळा पुढचं शिक्षण लिंबागणेश येथे, गेल्यावर्षी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हनुमान मंदिराचा कलशारोहण धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.गावालगत असणा-या  इंगोले परीवाराच्या दगडी बांधकाम केलेल्या खाजगी विहिरीतील पाण्यामुळे  माणुसकी धर्मामुळे  गावाची तहान भागत असुन पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.
पिढ्यानपिढ्या गावाला आमच्या भावकीच्या दगडी विहीरीतुन पाणी पुरवठा होतो . वेळ प्रसंगी उन्हाळ्यात भिजणं वाळत ठेवून गावाची तहान भागवतोत गेल्यावर्षी थोडं पाणी कमी पडलं तर विकतचे पाणी टँकर विहीरीत टाकून गावची तहान भागवली,त्याच्या सारखं पुण्याचं दुसरं कोणतं काम हाय. गावाला अद्याप पर्यंत इंगोले यांच्याच विहिरीतील पाण्याने पाणी पुरवठा होत असुन जल जीवन मिशन योजने अंतर्गत 64 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असुन लवकरच तिच काम सुरू होणार आहे. एरवी पाण्यामुळे एकमेकांची डोकी फोडणारी माणसं पहात असताना उन्हाळ्यात शेतातील भिजणं सोडून गावांसाठी पाणी देणे,कमी पडल्यानंतर टँकरने विकत पाणी घेऊन गावाची तहान भागवणे,त्याच बरोबर महिलांना दगडी विहिरीत खाली उतरायची वेळ येऊ नये म्हणून 12 हजार रुपये खर्चून लोखंडी रहाट बांधणे या माणुसकी धर्मामुळेच इंगोले परीवाराचे काम विशेष कौतुकास्पद आहे.

COMMENTS