Homeताज्या बातम्या

खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. (

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना



शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (ठ-थए) अंतर्गत आयोजित जनजागृती उपक्रमात करण्यात आले.मौजे खापर पांगरी येथे ‘जमिनीतील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंके, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे, कार्यक्रम समन्वयक डी. बी. राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल पांडुरंग ढोरमारे तसेच विषयतज्ज्ञ ए. जी. गार्डी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. अंजना राम माने आणि मार्गदर्शक श्री. पोपट शेंडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना रासायनिक खते, सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते तसेच जैवखते यांचा संतुलित व शास्त्रोक्त वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित मृदा परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात घट होऊन जमिनीची सुपीकता वाढते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुधारते आणि पर्यावरण संवर्धनासही हातभार लागतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी खत व्यवस्थापन, मृदा सुपीकता तसेच पीक उत्पादनाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी व विद्यार्थ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने समाधानकारक उत्तरे देत योग्य उपाययोजना सुचवल्या. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत भविष्यात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या राजकन्या मुंडे, निकिता कोळेकर, प्रतीक्षा राठोड, सुषमा पोकळे, संगीता जैस्वाल, राजश्री होगळे, वैष्णवी जमादार, ऋतुजा शिंदे, तन्मयी, आकांक्षा नेमाने व सारा शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास परशुराम काटकर, गोरख चव्हाण, सखाराम अजबे, बापूराव मिसाळ, धोंडीराम काटकर, सचिन कुसारे, हाफिज शेख, भाऊ मिसाळ, वैभव शेंडगे, बंकट ढोरमारे तसेच महिला शेतकरी गंगुबाई अजबे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS