Homeताज्या बातम्याबीड

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम संपन्न

केज तालुक्यातील आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात 14 जून 2026 रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व जनजागृतीपर व्याख

मी म्हणेल तोच कायदा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न



केज तालुक्यातील आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात 14 जून 2026 रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रक्तदानाचे महत्त्व, रक्ताची कमतरता आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता याविषयी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक व प्रख्यात व्याख्याते प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड तसेच बाळासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. रक्तदान हे सर्वोत्तम सामाजिक दान असून त्याद्वारे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव, रामेराव गायकवाड, ए. बी. गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आणि श्रुती पुंड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड होते. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत गौरी ज्ञानेश्वर गायकवाड, शिवराज जाधव, हर्षद गायकवाड, चैतन्य गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आणि आनंद गायकवाड यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी रक्तदानाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यविषयक जागरूकता या विषयांवर प्रभावी विचार मांडले. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना गौरी गायकवाड यांनी प्रथम क्रमांक तर आनंद गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दादासाहेब गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्या स्पर्धकांना दादासाहेब गायकवाड आणि प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक जागृती निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.

COMMENTS