Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा उत्साहात; ८० महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या पुढाकारातून आणि 'वर्ल्ड सायकल डे' (जागतिक सायकल दिन) निमित्त आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय ‘अस्मित

घोडेगाव शिवारात खळबळ; मनिषा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला
सरकारच्या उशिरा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; महागडी बियाणे-खते खरेदीसाठी शेतकरी सावकारांच्या दारात
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

नांदेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या पुढाकारातून आणि ‘वर्ल्ड सायकल डे’ (जागतिक सायकल दिन) निमित्त आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा रविवारी (१४ जून २०२६) येथील मोदी मैदानावर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळा, क्रीडा संस्था व अकॅडमींच्या एकूण ८० महिला सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नांदेड जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर, नेहरू युवा केंद्राच्या अश्नी कनकटे, संतोष कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, बन्टी सोनसळे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :

  • १४ वर्षांखालील गट : अनुष्का जिकलवाड (प्रथम), जागृती गजभारे (द्वितीय), नियती पातेवार (तृतीय).
  • १७ वर्षांखालील गट : कोमल पवार (प्रथम), सोनाक्षी सोनसळे (द्वितीय), मानवी कदम व तनक कोल्हे (संयुक्त तृतीय).
  • १९ वर्षांखालील गट : समीक्षा आढाव (प्रथम), श्रद्धा जाधव (द्वितीय), नागेश्वरी चित्तारे (तृतीय).

या स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल (पुयणी), नारायणा स्कूल (विष्णुपुरी), टायगर करिअर मार्शल आर्ट, रुद्रा कराटे अकॅडमी आणि नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बंटी सोनसळे, संतोष सोनसळे, निलेश खराटे, गोविंद पांचाळ यांच्यासह शहर वाहतूक शाखा व शासकीय रुग्णालयाच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

COMMENTS