Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

2500 शिक्षकांचा ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार

दीड लाख विद्यार्थांचे भविष्य धोक्यात

अहमदनगर प्रतिनिधी - 12 वीचे पेपर राज्यात सुरू होणार असुन आता 2500 शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 12 वीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार ट

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर प्रतिनिधी – 12 वीचे पेपर राज्यात सुरू होणार असुन आता 2500 शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 12 वीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे दीड लाख विद्यार्थांचे भविष्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान विषय संघटनेने  23, 24 आणि 25 मार्चला होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या बारावी बोर्ड ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. गेली 21 वर्ष अल्प वेतनावर हे सर्व शिक्षक कार्यरत आहे. महाराष्ट्रातून इयत्ता 12 वी आयटी ऑनलाईन बोर्ड परीक्षेसाठी 1 लाख 60 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट होणार असून 2500 पेक्षा जास्त शिक्षक या प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही , तर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा घेणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे व शिक्षक मान्यते पासून सेवा गृहीत धरावी या मागणीसाठी आय.टी. विषय संघटना परीक्षा बहिष्कारवर ठाम आहे.

COMMENTS