Homeताज्या बातम्या

प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

बीड : प्राध्यापकांनी केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही आजच्या काळाची गरज आहे. संशोधनातूनच नवीन ज्ञानाच

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश
बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
सांगवी सूर्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


बीड : प्राध्यापकांनी केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही आजच्या काळाची गरज आहे. संशोधनातूनच नवीन ज्ञानाची निर्मिती होते आणि समाजाच्या प्रगतीला दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. महेंद्र शिरसाट यांनी केले.
तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने शनिवारी (दि. 13 जून) आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रदीप रोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. उत्तम साळवे, प्रा. डॉ. मनोहर शिरसाट आणि प्रा. अर्जुन राठोड उपस्थित होते. आपल्या मनोगतात प्रा. डॉ. महेंद्र शिरसाट म्हणाले, जीवनात तत्त्वांशी कधीही तडजोड करू नका. महामानवांचे विचार आचरणात आणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जपा. आपण ज्या समाजातून घडतो, त्या समाजाचे ऋण फेडण्याची भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आई-वडिलांप्रमाणे भूमिका निभावत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. मनोहर शिरसाट यांनी प्रा. डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जपत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक विकासाचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ असंख्य विद्यार्थी व प्राध्यापकांना झाला असून ते शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. प्रा. डॉ. उत्तम साळवे यांनी आपल्या भाषणात डॉ. शिरसाट यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. देश-विदेशातील अनेक नामांकित पदव्या त्यांनी संपादन केल्या असून त्यांच्या कार्याचा परिचयच तब्बल 55 पानांचा असल्याचे त्यांनी नमूद केले. हे यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. प्रदीप रोडे म्हणाले की, प्रा. डॉ. महेंद्र शिरसाट यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठा आणि सामाजिक मूल्ये जपत कार्य केले. त्यांनी कधीही शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला नाही. महामानवांच्या विचारांना कृतीत उतरवत त्यांनी शिक्षक म्हणून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची जडणघडण केली असून विद्यापीठाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. या गौरव सोहळ्यास तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार बांदल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. योगिता लांडगे यांनी केले, तर आभार प्रा. किशोर वाघमारे यांनी मानले.

COMMENTS