तामसा : हदगाव तालुक्यातील तामसा येथे महसूल विभागाच्या पुनर्रचना प्रक्रियेअंतर्गत स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्य

तामसा : हदगाव तालुक्यातील तामसा येथे महसूल विभागाच्या पुनर्रचना प्रक्रियेअंतर्गत स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, या संदर्भात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल व वन विभागाने ११ जून २०२६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करून तामसा व परिसरातील नागरिकांकडून तातडीने हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रस्तावित आराखड्यानुसार, तामसा, आष्टी आणि मनठा ही महसूल मंडळे नवीन तामसा अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. तर मूळ हदगाव तहसील कार्यालयाकडे हदगाव, निवघा, तळणी, बरडशेवाळा आणि पिंपरखेड ही महसूल मंडळे कायम राहणार आहेत.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा सखोल विचार करून शासन यावर अंतिम निर्णय घेणार आहे. तामसा येथे हे स्वतंत्र कार्यालय स्थापन झाल्यास परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना महसूलविषयक कामांसाठी हदगावला जाण्याची गरज पडणार नाही. सर्व प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर अधिक सुलभ व जलद उपलब्ध होतील, अशी आशा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS