बीड : सरफराज नवाब काझी यांची शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या बीड जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल केज येथे एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात

बीड : सरफराज नवाब काझी यांची शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या बीड जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल केज येथे एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या तथा माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांच्या शुभहस्ते सरफराज काझी यांचा शाल व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष मा. ना. श्री. समीर गुलामनबी काझी, तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे (केज) उपाध्यक्ष डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरफराज काझी यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील शिवसेना अल्पसंख्याक विभागाला नवीन ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सत्कार सोहळ्यास शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, युवासैनिक, शिवसैनिक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS