Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी आंदोलन सुरूच ; शंभू बॉर्डरवर गोंधळ

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; दुकाने बंद

नवी दिल्ली ः शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकर्‍यांनी चलो दिल्लीचा न

सुपा शहरात लाठीचार्ज विरोधात पाळला बंद
कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू
जातीनिहाय जनगणनेचा तिढा

नवी दिल्ली ः शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकर्‍यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशीही शेतकर्‍यांनी आक्रमक होत आंदोलन केले. यावेळी शंभू बॉर्डरवर मोठा गोंधळ बघायला मिळाला.
हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर शेतकर्‍यांनी पुन्हा गोंधळ घातला. हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आहेत. काही आंदोलकांनी बॅरिकेडजवळ येण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भारतीय किसान युनियन (चढूनी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी म्हणाले की, शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी हरियाणाच्या सर्व तहसीलमध्ये ट्रॅक्टरसह निदर्शने करण्यात येणार आहेत. रविवार, 18 नोव्हेंबर रोजी हरियाणातील सर्व शेतकरी संघटना, खापंस, टोल समित्या आणि कामगार संघटनांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. शंभूसह इतर सीमेवर त्यांना आमंत्रण नसल्याने ते गेले नसल्याचे चढूनी यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे.

आंदोलनस्थळी शेतकर्‍याचा मृत्यू – पंजाब-हरयाणा सीमेवरील गेल्या 13 फेब्रुवारीपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. हरयाणा सरकारने शेतकर्‍यांना शंभू सीमेवर अडथळे निर्माण करून रोखून धरले आहेत. दरम्यान, सीमेवर ठिय्या आंदोलन करणार्‍या पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील ज्ञान सिंग (वय 70) या शेतकर्‍याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. ज्ञान सिंग या शेतकर्‍याला पहाटे 4 वाजता राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना पतियाळा येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात आपत्कालीन विभागात अर्ध्या तास उपचार केल्यानंतर या शेतकर्‍याने अखेरचा श्‍वास घेतला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

COMMENTS