Homeताज्या बातम्या

संत ईश्वर भारती महाराज समाधी सेवा हीच देवप्राप्तीचा मार्ग; बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहात सुरेश महाराज जाधव यांचे निरूपण

लिंबागणेश : "संत ईश्वर भारती महाराज यांच्या पवित्र समाधीची सेवा करणे हाच खऱ्या अर्थाने देवप्राप्तीचा मार्ग आहे. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भ

मिरजगावमध्ये प्रतिबंधित इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे शेवगाव पोलिसांना निवेदन
अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवी गती; उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

लिंबागणेश : “संत ईश्वर भारती महाराज यांच्या पवित्र समाधीची सेवा करणे हाच खऱ्या अर्थाने देवप्राप्तीचा मार्ग आहे. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य हे पूर्वपुण्याईमुळेच लाभते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुरेश महाराज जाधव यांनी केले.

अधिकमासानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सहाव्या दिवसाचे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. या सोहळ्याला हजारो भाविकांनी दर्शनासाठी आणि कीर्तन श्रवणासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तनप्रसंगी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ‘भावे गावे गीत, शुद्ध करूनियां चित्त’ या अभंगावर त्यांनी सखोल चिंतन मांडले.

कीर्तनादरम्यान सामाजिक व कौटुंबिक मूल्यांवर प्रकाश टाकत महाराज म्हणाले की, लग्न आयुष्यात एकदाच करावे, कुंभस्नान तीन वर्षांतून एकदा करावे आणि देव-संतांची वारी वर्षातून एकदा करावी. मात्र व्यायाम, अभ्यास, दान आणि संघटन या गोष्टी माणसाने रोजच केल्या पाहिजेत. शुद्ध अंतःकरणाने केलेले भजन हेच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन असून, संतांच्या संगतीत राहिल्याने जीवनाचे कल्याण होते. याप्रसंगी त्यांनी आई-वडिलांची सेवा, गुरुजनांचा आदर, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण आणि अन्नाचा अपव्यय टाळणे या विषयांवर विनोदी शैलीत समाजप्रबोधन केले.

या सोहळ्याला ह.भ.प. महंत महादेव महाराज भारती, ह.भ.प. महंत तुकाराम महाराज भारती, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, ह.भ.प. बबन महाराज मंजरीकर, ह.भ.प. तुपे महाराज उपस्थित होते. तसेच संगीतसाथ भजन सम्राट शहादेव महाराज येडे, संगीत अलंकार किशोर महाराज येडे, माऊली महाराज खोटे, मृदंगसाथ अशोक महाराज येडे, बजरंग महाराज पावणे यांच्यासह शेकडो टाळकरी, विणेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS