कोपरगाव : एखाद्या संस्थेच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे वाहून घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्याच्या कार्याचा गौरव क

कोपरगाव : एखाद्या संस्थेच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे वाहून घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्याच्या कार्याचा गौरव करणे आणि त्याच्या योगदानाची दखल घेऊन सन्मान करणे, म्हणजे त्याने आयुष्यभर केलेल्या प्रामाणिक कार्याची पावतीच देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) राज्य सचिव दीपक गायकवाड यांनी केले.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये तब्बल ४० वर्षे सुरक्षा अधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कैलास शेजवळ यांच्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. या कौतुक सोहळ्याचे आयोजन कोपरगाव येथील ‘ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत’ करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. परशराम साबळे, भाजप प्रदेश सदस्य नानासाहेब शिंदे, यादवराव त्रिभुवन, मुन्ना शेख, विजय शिंगाडे, प्रा. विशाल धारणगावकर, प्रा. जनार्दन सुपेकर, निलेश देवकर, मुन्ना पठाण, आबा गायकवाड आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. परशराम साबळे म्हणाले की, आजही समाजव्यवस्था प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या आधारावरच टिकून आहे. सेवाकाळात केलेली निष्ठावान कामगिरीच निवृत्तीनंतर व्यक्तीचे नाव उज्ज्वल करते. मान्यवरांनी कैलास शेजवळ यांच्या दीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांना भावी निरोगी व आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास कोपरगाव व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS