Homeताज्या बातम्या

आनंदगड तंत्रनिकेतनला प्रवेश सुविधा केंद्राची (FC) मान्यता; तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिलासा

अकोले : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दहावीनंतर प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Diploma Engineering) तसेच बारावी विज्ञाननंतर द्वितीय वर्ष पदविका अभि

सह्याद्री उजळला काजव्यांच्या मायावी प्रकाशाने! अकोलेतील ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची झुंबड; निसर्गाचा अद्भुत सोहळा
‘महा ऑनलाइन’ यंत्रणेत तांत्रिक बिघाड; अकोले तालुक्यात विद्यार्थ्यांचे हाल, ऑफलाइन दाखल्यांना मान्यता देण्याची जिल्हा ग्राहक पंचायतीची मागणी
कर्जमाफीच्या अटींविरोधात किसान सभेचे राज्यभर तीव्र आंदोलन; आज पुणे येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना देणार निवेदन
Akole Taluka Education Society's Technical Campus Akole, Ahmednagar,  Ahmednagar - Admission, Courses, Fees, and Ranking - Edugraph

अकोले : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दहावीनंतर प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Diploma Engineering) तसेच बारावी विज्ञाननंतर द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी वीरगाव येथील आनंदगड तंत्रनिकेतन महाविद्यालयाला ‘प्रवेश सुविधा केंद्राची’ (Facilitation Centre) अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अधिक सोयीचे होणार आहे.

तंत्र शिक्षण विभागामार्फत जून २०२६ पासून पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी विभागाने विशेष संकेतस्थळ विकसित केले आहे. याच पार्श्वभूमीवर आनंदगड तंत्रनिकेतन येथे हे अद्ययावत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. या सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ. अनिल रहाणे, संचालिका सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे, शिवराज वाकचौरे, अक्षय रहाणे, प्रतीक्षा रहाणे, समन्वयक प्रा. विद्याचंद्र सातपुते, केंद्र समन्वयक प्रा. प्राजक्ता आंबरे-सावंत आणि प्राचार्य विनोद गिरी यांनी केले आहे.

COMMENTS