Homeताज्या बातम्या

शिरपुरात ‘हस्ती बँके’च्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; लॉकरमध्ये विसरलेले सोन्याचे दागिने ग्राहकास सुपूर्त

https://www.youtube.com/watch?v=_MCOXCwYqZ8 शिरपूर : प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण शिरपूर येथे पाहायला मिळाले असून, दि हस्ती

मुलगी व मुलासोबतच सूनही पोलीस दलात; इस्माईल व फिरोज शेख यांची मेहनत आणि जिद्दीचे फळ
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मानवतेचे दर्शन; अपघातग्रस्तांना तत्काळ मदत
‘प्रवरा’च्या विद्यार्थ्याचा ‘नासा’ कडून गौरव

शिरपूर : प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण शिरपूर येथे पाहायला मिळाले असून, दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिक वागणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ११ जून) एका महिला ग्राहकाने बँकेतील लॉकर ऑपरेट केल्यानंतर नकळत सुमारे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच रु. ६०० इतकी रोख रक्कम लॉकर विभागातच विसरून ठेवली. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतरही त्या ग्राहकास मोठी चिंता निर्माण झाली होती.

दरम्यान, बँकेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी सुनील गुजराथी हे लॉकर विभागात गेले असता त्यांना सदर दागिने व रोख रक्कम आढळून आली. कोणताही मोह न बाळगता आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठ अधिकारी महेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली
व संपूर्ण साहित्य त्यांच्या स्वाधीन केले.

यानंतर शाखाधिकारी अतुल बागुल यांनी अत्यंत दक्षतेने कार्य करत मुख्य कार्यालय तसेच स्थानिक सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. सर्व आवश्यक शहानिशा, नोंदी व पडताळणी पूर्ण करून संबंधित वस्तू योग्य त्या ग्राहकाच्या असल्याची खात्री करण्यात आली.

त्यानंतर स्थानिक समितीचे चेअरमन कैलास अग्रवाल, सदस्य मुकेश अग्रवाल, संबंधित ग्राहकाचे नातेवाईक व बँकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ग्राहकास परत सुपूर्त करण्यात आली.

आपले हरवलेले मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्याने ग्राहकाने मोठा दिलासा व्यक्त करत बँकेचे व्यवस्थापन, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्थानिक समिती सदस्य तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेषतः सुनील गुजराथी यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले.

या उल्लेखनीय कार्याबद्दल स्थानिक समितीच्या वतीने सुनील गुजराथी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कृतीमुळे बँकेच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीची जाणीव पुन्हा एकदा सर्वांना झाली.

आजच्या काळात प्रामाणिकतेची उदाहरणे दुर्मिळ होत चालली असताना, अशा कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश जातो. ग्राहकांचा विश्वास जपणे, त्यांचे हित सांभाळणे आणि सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच खरी बँकिंग सेवेची ओळख असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे

◾महिला ग्राहका ची प्रतिक्रिया

माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली होती की मला खूप भीती वाटत होती. लॉकरमध्ये विसरलेले सोन्याचे दागिने परत मिळतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण बँकेच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे माझा विश्वास पुन्हा दृढ झाला. सुनील गुजराथी यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे. बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. अशा प्रामाणिक सेवेनेच ग्राहकांचा विश्वास कायम राहतो

COMMENTS