Homeताज्या बातम्या

मीरा-भाईंदर परिसरात आढळला जिवंत तोफगोळा; सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मीरा-भाईंदर : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरातील उत्तन येथे जमिनीत गाडलेला जिवंत तोफगोळा आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, पोलीस आणि राष्

ओबीसी आरक्षणावर धक्का लागू देणार नाही; लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर निशाणा
‘संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक अखंड परिवार; आमदार विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन
कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती
Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत  तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी | Navarashtra

मीरा-भाईंदर : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरातील उत्तन येथे जमिनीत गाडलेला जिवंत तोफगोळा आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (NSG) समन्वयातून करण्यात आलेल्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरातील काही नागरिकांना जमिनीत संशयास्पद धातूची वस्तू दिसून आली. या वस्तूबाबत शंका आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपासणी केली असता, ती वस्तू स्फोटक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाची मदत घेण्यात आली.

सुरक्षा पथकांनी परिसराचा ताबा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या. तपासणीदरम्यान आढळलेला तोफगोळा जुना असला, तरी त्यामधील स्फोटक क्षमता कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगत विशेष मोहीम राबविण्यात आली. अखेर संयुक्त प्रयत्नांतून तोफगोळा यशस्वीरीत्या निकामी करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांच्या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पोलिसांचे आवाहन: उत्तन, गोराई आणि वसई किनारपट्टीचा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या भागाचा संबंध पूर्वीच्या सागरी संरक्षण व्यवस्था आणि लष्करी हालचालींशी जोडला जातो. त्यामुळे जुन्या काळातील शस्त्रस्त्रे, तोफा किंवा स्फोटक अवशेष अधूनमधून सापडण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. सध्या संबंधित तोफगोळा नेमका किती वर्षांपूर्वीचा आहे, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू, धातूचा गोळा, पेटी किंवा स्फोटकासारखी दिसणारी सामग्री आढळल्यास तिला स्पर्श करू नये किंवा हलविण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तात्काळ पोलीस किंवा संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS