मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी (जि. बीड) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र आयकॉन्स 2026’ पुरस्कार वितरण सोहळ

मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी (जि. बीड) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र आयकॉन्स 2026’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यात राज्यस्तरीय गौरव करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल मेघनंद लॉन्स अँड रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश धस राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संग्राम जगताप, काशिनाथ दाते, अक्षय कर्डिले, ज्योती गाडे, पोपटराव पवार, महंत काशिनाथ महाराज, धनंजय जाधव तसेच संपत बारस्कर यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय प्रमुख पाहुणे म्हणून सुधाताई कांकरिया, अनिल लगड, मनसुरभाई शेख, रेश्माताई आठरे, रेश्माताई जगताप, डॉ. स्वाती जाधव, गणेश मोकाशी, सुवर्णाताई गिर्हे तसेच रेणुकाताई वराडे यांचा विशेष सहभाग राहणार आहे. यंदाचे वर्ष हे महाराष्ट्र आयकॉन्स पुरस्कार सोहळ्याचे आठवे वर्ष असून, गेल्या सात वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी, उद्योग, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अविनाश कदम असून त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. संयोजन समितीत उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव गहिनीनाथ पाचबैल, संतोष नागरगोजे, समीर शेख, अतुल जवणे, प्रेम पवळ, निसार शेख, राजेंद्र लाड, अक्षय विधाते, सोपान पगारे, ड. किशोर निकाळजे, सिताराम पोकळे, सय्यद बबलू, मनोज सातपुते, विठ्ठल राख, दादा पवळ, अमोल जगताप, अशोक कुताळ, आदिनाथ ठोंबरे, संतोष तांगडे, मारुती सत्रे, अतुल जाधव, किरण शिनगिरे, ओंकार कदम, संस्कार लाड आणि सचिन पवार यांचा समावेश आहे. राज्यभरातील पत्रकार, समाजसेवक, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा पुरस्कार सोहळा कर्तृत्ववान व्यक्तींना प्रेरणा देणारा आणि समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्याचे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS