Homeताज्या बातम्या

किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण

मुंबई : ठाणे येथील एका नामांकित रुग्णालयाबाहेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप घेत एका वृद्ध नागरिकाला परप्रांतीयाकडून मारहाण करण्यात

कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने


मुंबई : ठाणे येथील एका नामांकित रुग्णालयाबाहेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप घेत एका वृद्ध नागरिकाला परप्रांतीयाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाबाहेर एका वृद्ध व्यक्ती आणि प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद चिघळला आणि संतापाच्या भरात वाहनचालकाने वृद्ध व्यक्तीवर हात उगारल्याचे दिसून आले. मारहाणीमुळे वृद्ध नागरिक जखमी होऊन खाली पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेने हस्तक्षेप करून मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त वाहनचालकाने तिच्या विनंतीलाही प्रतिसाद न देता मारहाण सुरूच ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या संपूर्ण घटनेचे चित्रिकरण तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या भ्रमणध्वनीत केले. ही चित्रफीत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संबंधितावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विविध सामाजिक व राजकीय स्तरांवरून हालचाली सुरू झाल्या. स्थानिक पदाधिकार्‍यांनी संबंधित वाहनचालकाचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS