Homeअहमदनगर

कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही

कोपरगाव : महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन करणारे कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्र जागेअभाव

पुणतांब्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजनघाट संवर्धनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव; इतिहास जतनाला चालना
कोपरगावमध्ये मध्यरात्री गुंडांचा हैदोसधारदार शस्त्रे, दांडक्यांसह तरुणांचा ‘राडा’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  


कोपरगाव : महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन करणारे कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्र जागेअभावी बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार तालुकास्तरावर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येतात. या केंद्रांसाठी आवश्यक जागा, दूरध्वनी, फर्निचर, लेखनसाहित्य व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे. मात्र कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्राला अद्याप कायमस्वरूपी जागा उपलब्ध झालेली नसल्याची माहिती महिला समुपदेशक वैशाली झाल्टे आणि सचिन विघे यांनी दिली.
जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नवीन बांधकाम सुरू असल्याने हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समितीच्या घरकुल प्रात्यक्षिक गृहात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र राज्य व केंद्रस्तरीय तपासणी पथकाच्या पाहणीसाठी त्या जागेची आवश्यकता असल्याने केंद्र अन्यत्र हलविण्याबाबत पंचायत समितीने पत्र दिले आहे.
त्यानंतर पोलीस ठाणे, तहसील कार्यालय तसेच इतर शासकीय इमारतींमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचे समुपदेशकांनी सांगितले.
महिला समुपदेशन केंद्र सुरू राहण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र योग्य जागा उपलब्ध न झाल्यास हे केंद्र बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती डॉ. गावित्रे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS