Homeताज्या बातम्या

शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट जनआंदोलनरक्त सांडले तरी चालेल, पण शेती देणार नाही : मोर्चेकर्‍यांचा निर्धार

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी कोल्हापुरात मोठे जनआंदोलन उभे राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात

भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; व्यवसायर्चीं नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार
माहूरजवळ क्रेशरवर भीषण दुर्घटना; अंधारात मातीखाली दबून ऑपरेटरचा मृत्यू


कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी कोल्हापुरात मोठे जनआंदोलन उभे राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या आंदोलनात खासदार डहरर्ही चरहरीरक्ष, शेतकरी नेते ठरर्क्षी डहशीींंळ तसेच काँग्रेसचे नेते डरींशक्ष झरींळश्र यांनीही सहभाग नोंदविला.
ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी आणि शेतकर्‍यांनी महामार्गामुळे शेती आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली. जमीन गेली तर आमच्या कुटुंबाचे भवितव्य अंधारात जाईल. रक्त सांडले तरी चालेल, पण हा महामार्ग होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान बोलताना सतेज पाटील यांनी सरकारने शेतकर्‍यांच्या इच्छेविरुद्ध कोणताही प्रकल्प राबवू नये, अशी मागणी केली. विद्यमान नागपूर-रत्नागिरी मार्ग उपलब्ध असताना नव्या महामार्गाची आवश्यकता काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकर्‍यांची जमीन या प्रकल्पामुळे जाणार असून त्यामुळे हजारो कुटुंबे भूमिहीन होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात महामार्गासाठी करण्यात येणार्‍या हवाई मोजणीला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला. नागेवाडी आणि माऊली भाग्यनगर परिसरात शेतकरी व महसूल अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक वाद झाला. महामार्गच नको असेल तर मोजणी कशासाठी? असा सवाल उपस्थित करत शेतकर्‍यांनी मोजणी प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. प्रशासनाने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोध कायम राहिला. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सुमारे 805 किलोमीटर लांबीचा असून विदर्भातील वर्धा जिल्ह्यापासून कोकणातील सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे. हा सहापदरी मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतून प्रस्तावित आहे. मार्गावर अनेक मोठे पूल, बोगदे आणि विविध जोडमार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धार्मिक स्थळांना जोडण्याचा उद्देश
या महामार्गाद्वारे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडण्याचे नियोजन आहे. तसेच परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, नृसिंहवाडी आणि औदुंबर यांसारख्या तीर्थक्षेत्रांचाही समावेश प्रस्तावित मार्गात आहे.
शेतकर्‍यांच्या आक्षेपांचे प्रमुख मुद्दे
शेतकरी संघटनांच्या मते, या प्रकल्पासाठी सुमारे 27 हजार 500 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. अनेक बागायती क्षेत्रे, सुपीक शेती आणि भविष्यात विकासक्षम ठरणार्‍या जमिनी यामध्ये जाण्याची शक्यता आहे. डोंगर फोडून बोगदे, नद्या-नाल्यांवर भराव आणि मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकाम यामुळे पर्यावरणीय हानी होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गामुळे विकासाऐवजी शेती, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारने प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

COMMENTS