Homeताज्या बातम्या

वादळग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ.काळे

कोपरगाव : तालुक्यात शनिवारी (दि. ६) झालेल्या वादळामुळे अनेक गावांमध्ये शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने

धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संताप
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान


कोपरगाव : तालुक्यात शनिवारी (दि. ६) झालेल्या वादळामुळे अनेक गावांमध्ये शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेली असून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या गोठ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
 वादळामुळे हरितगृहे, पॉलिहाऊस तसेच कांदा साठवण चाळींच्या छतांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होऊन अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
 झालेल्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त नागरिक अथवा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नुकसानीचा अहवाल वेळेत तयार करून शासनाकडे सादर करावा, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
 वादळग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS