Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरामध्ये शनिवारी संध्याकाळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे शहर व परिसरातील अनेक भागात महावितरणच्या यंत्रणेला फटका बसला,

 रवी माळवे यांनी केला अंध व मुकबधीरांसोबत वाढदिवस साजरा
साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे
संजीवनीच्या 10 अभियंत्यांची नामांकित कंपनीत निवड

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरामध्ये शनिवारी संध्याकाळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे शहर व परिसरातील अनेक भागात महावितरणच्या यंत्रणेला फटका बसला, त्यामुळे महावितरणच्या 33 व 11 केव्हीच्या  वाहिन्यांचा तसेच रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र बंद झालेली वीज यंत्रणा सुरु करण्यासाठी शनिवारी व  रविवारी तात्काळ व अविरत  कार्य करीत महावितरणच्या अभियंत्यांनी व जनमित्रांनी टप्याटप्य्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आणि बंद पडलेली व बिघाड झालेली  यंत्रणा दुरुस्त करून शहरातील व परिसरातील बहुतांश भाग  आज पूर्ववत केला असून  रात्री उशिरा पर्यंत उर्वरित काम सुरू आहे.
अहमदनगर शहरामध्ये कालच्या मुसळधार पावसामुळे खांब कोसळले, वीज वाहिन्या  तुटल्या. झाडे पडल्याने पुरवठा खंडित झाला.  यामध्ये  33 केव्ही पॉवर हाऊस, सोलापूर रोड  उपकेंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने
केडगाव देवी रस्ता, सिध्दीबाग पॉवर हाऊस, स्टेशन रोड, माळीवाडा, बुरुडगाव रोड, मार्केट यार्ड, मल्हार चौक, गंजबाजार, अशोका, दरेवाडी या 11केव्ही वाहिन्यांचा बाधित पुरवठा शनिवारी रात्री उशिरा पूर्ववत करण्यात आला तर उर्वरित विद्युत वाहिन्यांवरील अर्धवट काम सुरू असलेले काम आज रविवारी सायंकाळ पर्यंत  अविश्रांत कार्य करीत पूर्ण करण्यात आले आहे. बहुतांश भागात तसेच ग्रामीण भागात जखनगाव, वाडेगव्हाण, भोयरे पठार, चास भिंगार व जेऊर शेंडी हा बाधित झालेला परिसर पूर्ववत झाला असून बोल्हेगाव, सावेडी परिसरही शनिवारी रात्री पूर्ववत करण्यात आला आहे.             

COMMENTS