Homeताज्या बातम्या

खिरविरेच्या चार युवकांची पोलीस दलात निवड  

अकोले : तालुक्यातील खिरविरे गावातील चार युवक-युवतींनी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवत खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. सिद्धेश राजू

अगस्ती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना
बितनगडावर महाराणा प्रताप जयंती उत्साहात 


अकोले : तालुक्यातील खिरविरे गावातील चार युवक-युवतींनी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवत खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. सिद्धेश राजू काळे, काजल पंढरीनाथ बेणके, रंजनी रामनाथ बेणके आणि स्वप्नाली विशाल बेणके यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते घड्याळ देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना लहामटे यांनी, “तुमचा सन्मान म्हणजे तुमच्या पालकांच्या कष्टांचा आणि त्यागाचा गौरव आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजात आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन केले.
 याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक सदगीर यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मिरवणूक काढून यशस्वी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. गावातील विविध संस्था, संघटना आणि युवक मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी काळू बेणके, रामदास डगळे, उपसरपंच सुभाष बेणके, प्रकाश पराड, सरपंच गणपत डगळे, हरी बेणके, राजू काळे, पंढरी बेणके, रामनाथ बेणके, भीमराव बेणके यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास डगळे यांनी केले, तर आभार भास्कर बेणके यांनी मानले.
  “पोलीस भरतीत यश मिळवून खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या खिरविरेच्या युवक-युवतींनी गावाचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवेच्या त्यांच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,” अशी भावना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केली.

COMMENTS